लांजा:- जि. प. पू. प्रा. आदर्श शाळा भडे नं.१ येथे विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश वाटप करण्यात आले.भडे गावचे सुपुत्र व माजी विद्यार्थी श्री. सूर्यकांत भरणकर, भडे यांनी विद्यार्थ्यांना मोफत क्रीडा गणवेश दिले. त्यावेळी त्यांचा सत्कार शाळा व्यवस्थापन समिती भडे नं.१च्या मा. अध्यक्ष श्रीम. मयुरी आडविलकर यांच्या शुभहस्ते शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. क्रीडा गणवेशामुळे खेळातील एकतेचे दर्शन होते व खेळाडूंना खेळण्यास अधिक प्रोत्साहन मिळते. या शाळेने विभागस्तरीय कुस्ती स्पर्धा,विभागस्तरीय आट्यापाट्या स्पर्धा त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत नेहमीच घवघवीत यश संपादन केले आहे.
त्याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्रीम. सानिका तोस्कर, शिक्षणप्रेमी संजीवकुमार राऊत, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य -भडे गावचे पोलीस पाटील श्री प्रशांत बोरकर, भडे नं १ शाळेचे मुख्याध्यापक श्री लीलाधर कुड, शिक्षकवृंद श्री माने सर, श्री खुटाळे सर, श्रीमती दळी मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. शाळेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी श्री.भरणकर यांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती भडे नं.१ यांनी समाधान व आभार व्यक्त केले आहेत.