रत्नागिरी:- आज रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीने 2025 च्या नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे आधारस्तंभ श्री प्रसन्न आंबूलकर यांचे हस्ते भैरव मंदिर खालची आळी येथे पार पडले. भंडारी समाजातील उद्योजक, हॉटेल व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक यांच्या माध्यमातून दरवर्षी दहा हजार दिनदर्शिकाचे वाटप भंडारी समाजामध्ये मोफत केले जाते. राष्ट्रीय सण, स्थानिक सण, महापुरुष , समाजसुधारक यांची माहिती असलेली जय भंडारी दिनदर्शिका भंडारी समाजातील घरांच्या भिंतीवरच नव्हे तर हृदयात स्थान करून आहे. समाज बांधव वर्ष अखेरीस नूतन दिनदर्शिकेची आवर्जून वाट पहात असतात.
यावेळी संघाचे अध्यक्ष श्री राजीव किर, कांचन मालगुंडकर, ऍड. प्रज्ञा तिवरेकर, चंद्रहास विलणकर, अमृता मायनाक, राजन विलणकर, चंद्रशेखर गडदे, विजय बिर्जे, दिलीप भाटकर,आदेश भाटकर, अस्मिता चवन्डे, संतोष चव्हाण, सुरेंद्र घुडे, सुहास धामणस्कर, चंद्रकांत शेळटकर, अमित भाटकर, मुकुंद विलणकर, सुरेश शेट्ये, गजानन लाड, उर्मिला तळेकर,अरुणा शिरधनकर ,आदिती शिरधनकर, स्मिता भिवंदे, मिलिंद नार्वेकर, सुरेश पारकर, मंथन मालगुंडकर आदी उपस्थित होते