भांबेड (लांजा):- भांबेड येथील बँक ऑफ इंडिया चे एटीएम गणेशोत्सव काळात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी बंद असल्याने मुंबईतून किंवा इतर पर गावातून आलेल्या चाकरमान्यांना आपले पैसे काढण्याकरिता अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. बँकेच्या फाउंडेशन दिवसाच्या दिवशी बँक ऑफ इंडियाचे एटीएम बंद असल्याने बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेवेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एटीएम सहा सप्टेंबर पासून ते आजपर्यंत बंद असल्याची माहिती श्री. प्रमोद धनावडे यांनी दिली आहे. तसे छायाचित्र व चित्रफीत त्यांनी प्रसिद्ध केली आहे.