सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो (रत्नागिरी द. जिल्हा) तर्फे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न!

0
33

रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद.

रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा शासकीय रक्तपेढी येथे भाजयुमो (रत्नागिरी द. जिल्हा) तर्फे दि. १९ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. रक्तदात्यांनी शिबिराला उत्तम प्रतिसाद दिला. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर पार पडले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्री. जयप्रकाश रामानंद यांनी रक्तदान शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या.

शिबिराला महिला, युवक – युवती यांचा विशेष प्रतिसाद लाभला. ३८ रक्तदात्यांनी शिबिरात रक्तदान केले. यावेळी रत्नागिरी दक्षिण भाजप चे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, तालुकाध्यक्ष दादा दळी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, शहराध्यक्ष श्री. राजन फाळके, रत्नागिरी दक्षिण भाजयुमो जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर, सरचिटणीस अनिरुद्ध फळणीकर, स्वप्नील गोठणकर, जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक शिंदे, भाई जठार, ऐश्वर्या जठार, मनोज पाटणकर, राजन पटवर्धन आदि पदाधिकारी, कार्यकर्ते व रक्तदाते उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा शासकीय रक्तपेढीच्या अधिकारी- वर्गाचे सहकार्य केल्याबद्दल युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. ऋषिकेश केळकर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here