चिपळूण – संगमेश्वर विधानसभेसाठी गाव विकास समितीकडून तीन उच्च शिक्षित तरुणांची नावे चर्चेत!

0
51

एडवोकेट, कृषी तज्ञ, उच्च शिक्षित महिला यापैकी कुणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष.

संगमेश्वर:- गाव विकास समितीने संगमेश्वर – चिपळूण मतदार संघात चाचपणी सुरू केली असून यावेळी सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित उमेदवार गाव विकास समिती कडून दिला जाण्याची शक्यता आहे. एडवोकेट सुनील खंडागळे, संघटनेच्या महिला उपाध्यक्षा सौ. अनघा कांगणे, कृषी तज्ञ राहुल यादव यांच्या नावाची चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघासाठी चर्चा आहे.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात गाव विकास समिती कोणता उमेदवार देणार याकडे लक्ष लागलेले असताना गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे या मतदारसंघात उच्च शिक्षित उमेदवार उतरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा या तरुणांच्या संघटनेत अनेक सुशिक्षित तरुण कार्यरत आहेत. यापैकी डॉक्टर, एडवोकेट, कृषी तज्ञ, उच्च शिक्षित महिला असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना संधी दिली जाते का? याकडे लक्ष लागले आहे.

संघटनेचे कायदेविषयक सल्लागार एडवोकेट सुनील खंडागळे,महिला उपाध्यक्षा सौ. अनघा कांगणे व शेती क्षेत्रात काम करणारे कृषी तज्ञ राहुल यादव यांच्या नावाची प्राथमिक चर्चा संघटनेच्या वर्तुळात झाल्याची माहिती आहे. सर्वसामान्य तरुणांची संघटना असणाऱ्या गाव विकास समितीकडून प्रथमच विधानसभेसाठी चाचपणी करण्यात येत असून एकीकडे बलाढ्य राजकीय पक्षांचे उमेदवार असताना दुसरीकडे नवख्या गाव विकास समितीचे तरुण उमेदवार यांचा धनाड्य व पैशांच्या जीवावर राजकारण करणाऱ्या विरोधात निभाव लागणार का ? अशी चर्चा या निमित्ताने होऊ घातली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here