नवरात्रीची दुसरी माळ, देवी ब्रह्मचारिणीच्या पूजा विधीसह मंत्र जपाबद्दल जाणून घ्या!

0
53

लेखन:- श्री. बाबा ढोल्ये, रत्नागिरी

नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज देवी ब्रम्हचारिणीची पूजा केली जाणार आहे. ४ ऑक्टोंबरला केल्या जाणाऱ्या देवी ब्रम्हचारिणीच्या पूजेची विधी, मंत्र जप, कथा आणि नियम अशा काही गोष्टी …….

देवी ब्रम्हचारिणी

देवी ब्रम्हचारिणी देवीचे दुसरे स्वरुप आहे. देवीच्या नावात ब्रम्ह आहे. याचा अर्थ तपस्या आणि चारिणीचा अर्थ आचरण करणारी असा होतो. भगवान शंकराच्या विवाहासाठी अखंड प्रतिज्ञा आणि कठोर तप केला होता.

देवी ब्रम्हचारिणीचे स्वरुप

देवी ब्रम्हचारिणी साक्षात ब्रम्हाचे स्वरुप आहे. देवीला या लोकातील समस्त चर आणि अचर जगातील विद्यांबद्दल ज्ञान असल्याचे माने जाते. देवीने पांढऱ्या शुभ्र रंगातील वस्र परिधान केलेले आहेत. देवी ब्रम्हचारिणीच्या डाव्या हातात जप माळा आणि उजव्या हातात कमंडल आहे. देवी पवित्रता, शांती, तप आणि शुद्ध आचरणाचे प्रतीक मानले जाते.
देवी ब्रम्हचारिणीच्या पूजेवेळी म्हणा मंत्र

ह्रीं श्री अम्बिकायै नम:।
दधाना कपाभ्यामक्षमालाकमण्डलू। देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।
या देवी सर्वभूतेषु मां ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।

देवी ब्रम्हचारिणीचा आवडता नैवेद्य

देवी ब्रम्हचारिणीला साखरेचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे. असे केल्याने आयुष्य वाढते असे म्हटले जाते.

देवी ब्रम्हचारिणीची कथा

पौराणिक कथेनुसार, देवीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर तप केला होता. त्यावेळी तिचे हे रुप शैलपुत्री म्हणून सांगितले गेले. पण देवीने ज्यावेळी नियमांचे पालन आणि ज्या प्रकारे शुद्ध आणि पवित्र आचरण तपस्येवेळी केल्याने तिचे नाव ब्रम्हचारिणी पडले गेले.

(टीप:– वरील माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली असून या संबंधित कुठल्याही प्रकारचे समर्थन व दावा आम्ही करत नाहीत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here