‘आदित्यला सांभाळून घ्या’ म्हणत उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला!

0
62
Narayan Rane Press Conference.
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदे नंतर दिशा सालीयन व सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चिले जात आहे.

दिशा सालियन प्रकरणात फोन आल्याचा नारायण राणे यांचा गौप्यस्फ़ोट.

मुंबई:- भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

नारायण राणे यांच्याकडून दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुन वारंवार आदित्य ठाकरे यांच्याकडे बोट दाखवलं जात आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या मृत्यू प्रकरणाचे पुरावे विधानसभेत बंद लिफाफ्यात सादर केले होते. या प्रकरणी तपास सुरु आहे. पण अद्याप त्याबाबत काहीच माहिती समोर येऊ शकलेली नाही. असं असताना नारायण राणे यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता. या फोनमधून त्यांनी आदित्यला सांभाळून घ्या, अशी विनंती केल्याचा दावा नारायण राणे यांनी केला.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूआधी (Sushant Singh Rajput Death) दिशा सालियन हिचा मृत्यू (Disha Salian Death Case) झाला होता. दिशा सालियन ही सुशांतची माजी मॅनेजर होती. सुशांतच्या मृत्यूच्या एक महिन्याआधी दिशाचा मृत्यू झाला होता. दिशा घराच्या बाल्कनीतून खाली पडून तिचा मृत्यू झाला होता. सुरुवातीला दिशाने आत्महत्या (Disha Salian Suicide) केल्याची चर्चा होती. यानंतर या प्रकरणावरुन नारायण राणे यांनी थेट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यामुळे संबंधित प्रकरणाला वेगळे वळण लागले. याच प्रकरणी आदित्य ठाकरे यांचं नाव येऊ नये किंवा आदित्य यांचं नाव घेऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांचा आपल्याला फोन आला होता, असा मोठा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

यावेळी नारायण राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोनबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं. “आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन लावून दिला. आदित्यला सांभाळून घ्या. तुम्हालाही दोन मुलं आहेत, असं मला फोनवर उद्धव ठाकरे बोलले. मग मी सांगितलं तुमच्या मुलाला असे संध्याकाळचे सोडू नका सातच्यानंतर”, असा टोला नारायण राणे यांनी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here