कसबा येथे काळभैरव जयंती निमित्त विविध कार्यक्रम.

0
37

कसबा (संगमेश्वर):- दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या कसबा संगमेश्वर येथील श्री देव काळभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिरामध्ये कालभैरव जयंतीचा उत्सव कार्तिक वद्य अष्टमी शके १९४६ शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. तरी सर्व भक्त मंडळींनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर विश्वस्त समितीने केले आहे.

श्री काळभैरव जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम पुढील प्रमाणे

▪️ शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वा. प्रवचन- ह.भ.प. श्री. श्रीनिवास पेंडसे, शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.०० वा.रुद्राभिषेक, सकाळी १०.३० वा. प्रकटदिन किर्तन – ह.भ.प. श्रीनिवास पेंडसे साथसंगत – तबला किरण लिंगायत, संवादिनी आनंद लिंगायत, दु. १२.३० वा. आरती व मंत्रपुष्पांजली, दु. १ ते ३ वा. महाप्रसाद, दुपारी ३ ते ५ महिलांचे भजन, रात्री ७.३० ते ८ वा.आरती व मंत्रपुष्पांजली,रात्री ८.३० ते १०.३० वा. : संगीत भजन सर्व भक्त मंडळींनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव काळभैरव जोगेश्वरी (भैरीभवानी) मंदिर कसबा संगमेश्वर विश्वस्त मंडळाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here