नारळाच्या झाडावरून पडून नेपाळी गुरखा गंभीर जखमी; साटवली भंडारवाडी येथील घटना.

0
13

लांजा:- उंच असलेल्या नारळाच्या झाडावरून खाली पडल्याने नेपाळी गुरखा गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे घडली आहे. या घटनेत अति गंभीर झालेल्या नेपाळी गुरुक्याला तातडीने कोल्हापूर येथे उपचार साठी हलवण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजापूर तालुक्यातील दसुर येथील श्री. उस्मान काझी (आंबा व्यावसायिक) यांच्याकडे सदर गोविंद थापा नावाचा नेपाळी गुरखा त्यांच्या बागेमध्ये आहे. लांजा तालुक्यातील साटवली येथे दररोज दूध घालण्यासाठी साटवली येथे डेअरीवर दूध घालण्यासाठी सदरचा नेपाळी येत असतो. सोमवारी 16 डिसेंबर रोजी तो सकाळी नेहमीप्रमाणे साटवली येथे दूध घालण्यासाठी आला होता यावेळी साटवली भंडारवाडी येथील एका व्यक्तीने त्याला आपल्या नारळाच्या झाडावर नाळ काढण्यासाठी चढवले होते. मात्र नारळाच्या उंच झाडावरून खाली पडल्याने गोविंद थापा नेपाळी कामगार गंभीर जखमी झाला होता.

त्याला तातडीने लांजा व त्यानंतर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र त्याची उंच झाडावरून पडल्याने प्रकृती अति गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here