चिपळूण:- कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी – पालवण संचलित जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, मांडकी – पालवण मधील गायत्री मांगडे – द्वितीय वर्ष कृषी हिने शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे आयोजित आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव – मयुरपंख 2024 वक्तृत्व स्पर्धत प्रथम पारितोषिक मिळवले आहे.
सर्व विजेते, सहभागी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे संघ व्यवस्थापक यांचे संस्थेचे अध्यक्ष – डॉ. तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष- डॉ. निखिल चोरगे, संचालिका – सौ. अंजलीताई चोरगे, डॉ. शमिका चोरगे – प्राचार्या, जिजामाता महिला कृषी महाविद्यालय, डॉ. संकेत कदम – प्राचार्य, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी – पालवण यांच्यावतीने आणि सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.