
सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर केली चर्चा!
रत्नागिरी (प्रतिनिधी):- रयत क्रांती संघटनेचे प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री व विद्यमान आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी रयत क्रांती संघटनेच्या (Rayat Kranti Sanghatna) जिल्हाध्यक्ष तसेच संघटनेच्या आरोग्य आघाडीच्या प्रमुख पदी कोकणातील प्रसिद्ध भजनीबुवा श्री. संतोष आरावकर (आरावकर बुवा) यांची निवड केली आहे. नियुक्ती होताच श्री. आरावकर यांनी रत्नागिरी चे जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon) डॉ. भास्कर जगताप यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील (Ratnagiri District Civil Hospital) विविध समस्यांविषयी चर्चा केली तसेच रुग्णालयातील अंतर्गत कामकाजाविषयी माहिती करून घेतली.
ग्रामीण भागांतून येणाऱ्या गोरगरीब रुग्ण व नातेवाईक यांना योग्य अशी सेवा व आदराची वागणूक सिव्हिल हॉस्पिटल द्वारा मिळावी व त्यांच्या अडी-अडचणींकडे सहानुभूती ने पाहण्यात यावे तसेच सुयोग्य रितीने समस्यांची सोडवणूक व्हावी, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष श्री. आरावकर यांनी डॉ. जगताप यांच्याकडे व्यक्त केली. डॉ. जगताप यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व आरावकर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार हृषिकेश सावंत देखील उपस्थित होते.