साखरपा नं १ केंद्राच्या केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न साखरपा नं १ शाळेला सर्वसाधारण विजेते पद.

0
30

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील साखरपा नं १ केंद्राच्या हिवाळी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या या केंद्रातील अकरा शाळा सहभागी झाल्या होत्या जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये व सरपंच प्रियांका जोयशी यांनी या स्पर्धेचे उदघाट्न केले या स्पर्धा जोयशीवाडीतीतील भव्य मैदानात घेण्यात आल्या होत्या.

यामध्ये सांघिक व शाररिक खेळ घेण्यात आले या क्रीडा स्पर्धेत खोखो व कब्बड्डी लहान व मोठा गट सांघिक खेळात दैदिप्यमान खेळ करून साखरपा नं १ शाळेचा अंतिम विजेता ठरला त्यांच्या यशाबद्दल खेळाडूंचे व शिक्षकांचे कौतुक करण्यात आले यशस्वी संघाला संजय सुर्वे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी सर्व शाळेचे मुख्याध्यपक सर्व शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य केंद्रीय प्रमुख दिव्या भाटकर; सरपंच प्रियांका जोयशी; प्रवीण जोयशी; शांताराम जोयशी; संदिप जोयशी; नीलम शेडे उपस्थित होते स्पर्धेच्या तयारीसाठी मुख्याध्यपक सुनील कांबळे पदवीधर शिक्षक संजय nte उपशिक्षका बाबासाहेब लाड सुवर्णा वारके वर्षा बेबले ज्योती कांबळे यांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here