संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांचे आवाहन.
रत्नागिरी:- संविधानात अनेक महत्त्वाची मूल्य असून त्यांचा अंगीकार आपण आपल्या कृतीत आणि व्यवहारात केला तर त्याचा समाजाला आणि देशाला फायदा होणार आहे त्यामुळे या मूल्यांची जपणूक करत आपण आपल्या भारत देशाला आर्थिक महासत्ता बनवूया असे आवाहन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी केले.
प्रो. त्रिपाठी भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात आयोजित भारतीय संविधान दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे उपस्थित होते. यावेळी सामूहिक संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. तसेच संविधानाची पार्श्वभूमी सांगण्यात आली. यावेळी कार्यक्रमात विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.