कुवारबाव येथील कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जागा त्वरित हस्तांतरित करावी – भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे.

0
37

रत्नागिरी:- कुवारबाव गावासाठी कचरा निर्मूलन प्रकल्पासाठी शासनाकडून निधी मंजूर होत असून जागे अभावी तो प्रलंबित आहे.गावचा कचऱ्याचा प्रश्न जटिल बनला असून सर्वत्र त्यामुळे प्लास्टिक व दुर्गंधी पसरत आहे.

या साठी गावातील पत्रकार बंधूनीही आंदोलनाची हाक दिली होती त्यावेळी २८/१०/२०२३ रोजी पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी याना पत्र दिले होते.गावाच्या अत्यावश्यक प्रकल्पांना जमीन हस्तांतरित उशिर होत असल्यामुळे निषेध म्हणून यापुढे कुवारबाव गावामधे शासकीय कार्यालय व गावाबाहेरील व्यक्तीना जमिनी साठी कोणतीही नाहरकत देऊ नये व दिल्या असलेल्या सर्व ना हरकत रद्द कराव्यात असा ठराव ग्रामसभेला करण्यात आला आहे.

सदर हस्तांतरण त्वरित करावे यासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे,दीपक आपटे, शामराव माने,संजय माने,रसिक कदम यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन याबाबत त्वरित आदेश करण्याची विनंती केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here