CPM Leader Sitaram Yechury: माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन!

0
47
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन

नवीदिल्ली:- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप) नेते सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. येचुरी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. सीताराम येचुरी 72 वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ते एक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इंफेक्शनने त्रस्त होते. त्यांना 19 ऑगस्टला दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या दरम्यान आज दुपारी त्यांचं निधन झालं. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र त्यांना वाचवता आलं नाही. कम्युनिस्ट पक्षाचा देशातील चढता आलेख आणि याच पक्षाला लागलेली उतरती कळा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पाहिली. त्यांच्या निधनानं कम्युनिस्ट पक्षाचा एक बुद्धिजीवी चेहरा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here