खाजगी ट्रॅव्हल्स ने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचे सोन्याचे दागिने चोरीला!

0
53

संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार.

संगमेश्वर:- मुंबईहून गावाला खाजगी ट्रॅव्हल्स ने येत असलेल्या प्रवाशाचे सोन्याचे दागिने प्रवासा दरम्यान अज्ञात चोरट्याने असल्याची फिर्याद संगमेश्वर पोलीस ठाण्यात (Sangameshwar Police Station) करण्यात आली आहे.

याबाबत सौरभ सुभाष चाळके याने फिर्याद दिली आहे. सौरभ सुभाष चाळके राहणार डिंगणी चाळके वाडी हा मंगळवारी रात्री खाजगी ट्रॅव्हल्स ने मुंबईहून संगमेश्वर कडे येत होता त्याच्या बॅगेमध्ये मंगळसूत्र अंगठी तसेच कानातले सोन्याचे दागिने होते. त्याची किंमत 2लाख 70 हजार रुपये आहे. प्रवास करत असताना बॅगेमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने सावर्डे येथे पाहिले असता त्याला ते आढळून आले नाहीत.

त्यानंतर आरवली या ठिकाणी येऊन सदरची बाब पोलिसांना सांगितली त्यानंतर पोलिसांनी तपास करीत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here