संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील संतगाडगे माहाराज नगर मधील रमाकांत पाटेकर व सुवर्णा पाटेकर यांच्या घरी दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सवात श्रीकृष्ण लीला हा देखावा गणेश भक्तांचे आकर्षण ठरला आहे.
पृथ्वीतलावर देवराज इंद्रदेवाचा घोर अपमान झाला असल्याचे इंद्रदेव उग्रपथला सांगतो मात्र उग्रपथ इंद्र देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी तपस्या करून कोणत्याही परिस्थितीत प्रसन्न करून घेणार असल्याचे उग्रपथ सांगतो मात्र त्यासाठी इंद्रदेव उग्रपथला सांगतो कि मला पशुबली पाहिजे उग्रपथ देवाची आज्ञा पूर्ण करण्यासाठी मोहिमेवर जातो मात्र थांबा उग्रपथ काका असा आवाज रयतेचा राजा श्रीकृष्ण देतो भक्तीचा आधार!! भय असेल तिथे भक्ती वास करीत नाही कुठल्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोण्या निर्दोषाला बळी देण्याचा प्रयत्न केलास तर कोणती देवता प्रसन्न होण्यास योग्यता नाही, ती देवताही नाही अशा देवतेचा त्याग करणे योग्य आहे असे निक्षुन सांगतो आणि आपल्या भक्तांचे, रयतचे रक्षण करतो.
प्रचंड पाऊस वादळवारे पूर या साऱ्यांपासून सर्वजण भयभीत होतात आमची रक्षा हा गोवर्धन पर्वतच करू शकतो जो अन्न ग्रहण करू शकतो तो आमची रक्षा का करू शकणार नाही यासाठी गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी असंख्य हात लाठी-काठी प्रहार यांच्या सहाय्याने गोवर्धन पर्वत उचलण्यास सुरुवात करतात मात्र पर्वत जागचा हलत देखील हीच किमया श्रीकृष्ण आपल्या करंगळीनें गोवर्धन पर्वत उचलून पर्वताच्या छताखाली गुरेढोरे रयत सवंगडी आसरा घेतात.
गोवर्धन पर्वताने आपले रक्षण केल्याच्या आनंदात हर्षुन जातात प्रार्थनेचे फळ आम्हाला मिळाले जिथे भय आहे तिथे भक्ती वास करीत नाही तर प्रेम व श्रद्धेच्या जोरावर यश निश्चित मिळते हे श्रीकृष्ण लिलेच्या देखव्यातून दाखवण्यात आले आहे
शेकडो भक्तांनी हा देखावा पाहण्यासाठी गर्दी केली होती.