रत्नागिरी:- तायक्वांदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायक्वांदो असोसिएशनच्या सहकार्याने तायक्वांदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इनडोर स्टेडियम पेडम म्हापसा गोवा येथे दि. १३ ते १५ डिसेंबर २४ दिवसात होणाऱ्या या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी देशाच्या विविध राज्यातून खेळाडू सहभाग होणार आहे तरी या स्पर्धेसाठी रत्नागिरीतील एस आर के तायक्वांदो क्लब रत्नागिरी चे खेळाडू या स्पर्धेला सहभाग नोंदवणार आहे.
खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – यज्ञा चव्हाण स्वरा साखरकर रावी वारंग आयुष चव्हाण स्वर्निका रसाळ निर्मित सावंत प्रांजल लांजेकर मृण्मयी वायंगणकर रोहित कुंडकर श्रेयसी हातीसकर, यश भागवत अद्वैत मिश्रा विधान कांबळे तीर्था लिंगायत सलोनी सुर्वे तुळजा हर्षे गार्गी घडशी या खेळाडूंना स्पर्धेकरिता तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना,क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत, सचिव शितल खामकर कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य वीरेश मयेकर, निखिल सावंत, कांचन काळे यांनी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक शाहरुख शेख मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभत आहे.