‘राष्ट्रवादी’चे (श प गट) प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांची वचनपूर्ती; अखंड हरीनाम सप्ताहनिमित्त संरक्षक भिंतीचे उद्घाटन;ग्रामस्थांनी मानले प्रशांत यादव यांचे आभार.
चिपळूण:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोळकेवाडी बोलाडवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांनी बुधवारी (ता. 11 ) सदिच्छा भेट दिली आणि दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे उद्घाटनही यावेळी प्रशांत यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
श्री क्षेत्र बोलाडवाडी कोळकेवाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरासाठी ग्रामस्थांची संरक्षक भिंतीची मागणी होती. या भिंतीचे काम मार्गी लावण्याची आश्वासन प्रशांत यादव यांनी दिले होते. त्यानुसार त्यांनी स्वखर्चातून ही संरक्षक भिंत बांधून दिली. बुधवारी अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त प्रशांत यादव यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला शुभेच्छा भेट दिल्यानंतर त्यांच्याच हस्ते मंदिर परिसरासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशांत यादव यांचा ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच मंदिर परिसरासाठी संरक्षक भिंत बांधून वचनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांनी प्रशांत यादव यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना (उबाठा)तालुकाप्रमुख विनोद झगडे, अलोरेचे माजी सरपंच भाऊ मोहिते यांच्यासह वाघजाई केदार देवस्थानचे अध्यक्ष जयवंत शिंदे, कोळकेवाडीचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, सदाशिव बैकर महाराज, दीपकराव शिंदे, निवृत्ती मुकनाक महाराज, अशोक शिगवण, सिताराम शिगवण महाराज, योगेश बोलाडे महाराज, सिताराम वीर, सुनील मोरे, तुकाराम कदम, विलास बोलाडे, किरण ढापसे आदी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.