सावंतवाडी:- जागतिक वारसा स्थळात नामांकन मिळाल्यानंतर युनेस्कोच्या पथकाने आज मालवण येथील किल्ले सिंधुदुर्गला भेट देत पाहणी केली. यावेळी या पथकाचे किल्ला रहिवासी, शिवप्रेमींच्यावतीने पारंपरिक वाद्ये वाजवून जल्लोषात स्वागत केले गेले. पर्यटन विकास महामंडळाच्या आरमार या बोटीद्वारे या पथकाने समुद्रात चहुबाजूने किल्ले सिंधुदुर्गची पाहणी केली. त्यानंतर किल्ले सिंधुदुर्ग येथे तटावरून किल्ल्याची पाहणी केली. शिवराजेश्वर मंदिरास भेट देत स्थानिक किल्ला रहिवाशांशी संवाद साधला.