वेगवेगळया कारणांमुळे सतत विद्युत पुरवठा खंडीत; जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी विदयुत विभागाबाबतची नाराजी व्यक्त करत विचारला जाब.
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप परीसर हा एम.आय.डी.सी. ला जोडलेला आहे. त्यामुळे या परिसरात सतत वेगवेगळया कारणांमुळे सतत विद्युत पुरवठा खंडीत केला जातो. यामुळे या परिसरात राहणा-या लोकांना याचा फार त्रास होत आहे. व विदयुत विभागाबाबत नाराजी पहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक चार, पाच, सहा या भागातील कार्यकर्त्यांनी याबाबत जिल्हाध्यक्ष यांच्याकडे प्रश्न मांडला होता.
जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी याबाबत तातडीने निर्णय घेत विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट देत जाब विचारला व या परिसरातील लोकांना लवकरात लवकर न्याय मिळावा हा परीसर रत्नागिरी शहर युनिटला जोडला जावा जेणेकरुण नागरिकांना सततच्या विदयुत पुरवठा खंडीत होत असलेल्या त्रासापासून दिलासा मिळेल. विदयुत विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी ही विनंती कार्यकारी अभियंता, विदयुत विभाग, रत्नागिरी यांना निवेदन देऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत यांनी केली आहे.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या सह शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, नितीन गांगण, मंदार खंडकर, शैलेंद्र बेर्डे, प्रसाद बाष्ठे, संजीव बने, राजू भाटलेकर, तुषार देसाई, सौ. सायली बेर्डे आधी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.